Posts

Showing posts from August, 2020

नारायणराव बल्लाळ पेशवे

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ             नारायणराव बल्लाळ पेशवे (१७५५-१७७३)-  पांचवा पेशवा. नानासाहेब पेशव्यांचे हे धाकटे पुत्र: हे स्वभावाचे तापट व स्नानसंध्याशील असून पोरवयामुळें त्यानां पेंचपांच, भारदस्तपणा व सारासार विचार कमी होता. यांचा जन्म ता. १०-८-१७५५ रोजी होऊन, मुंज २८ मे स. १७६२ त दादासाहेबांच्या हातून झाली. यांचें लग्न २२ एप्रिल १७६३ रोजीं सिंहगडास कृष्णाजी हरि साठे (तपकीर गल्लींतील) यांच्या कन्येशी होऊन तिचें नांव गंगाबाई ठेवण्यांत आलें; एकदां गुलटेकडीवर साठणारी पहात असतां एक हत्ती माधवराव व नारायणराव बसले होते तिकडे चालून आला. नारायणराव उठून जाऊं लागले तेव्हा माधवरावांनीं, नारायणा, जाऊं नकोस, गेल्यास तुझ्याबद्दल तवारखकार काय म्हणतील? असें म्हटल्यावर हे तेथें बसून राहिले. यावरून ग्रँटडफ म्हणतो कीं, जर ते जगते तर धाडसी बनण्याचा संभव होता. परंतु १८ व्या वर्षीच त्यांचा अंत झाल्यानें त्यांच्या गुणावगुणाबद्दल ठाम मत देतां येणें शक्य नाहीं. माधवरावांनी आपल्या मृत्युसमयीं दादासाहेबांच्या हाती नारायणरावांचा हात देऊन, एकमतानें चा...

माधवराव बलजळ पेशवे

विभाग आठरावा : बडोदें ते मूर                  माधवराव बलजळ पेशवे (१७४५-१७७२)-  नानासाहेब पेशवे व गोपिकाबाई यांचा दुसरा मुलगा साबनूर येथें (१६।२।१७४५) जन्मला. मुंज १४।२।१७५२ आणि लग्न ९।१२।१७६१ रोजीं झालें. बायकोचें नांव रमाबाई (जोशी) असून त्याला पेशवाईचीं वस्त्रें २०।७।१७६१ रोजीं मिळालीं. प्रथम राघोबादादा कारभार पहात असे. लवकरच निजामानें स्वारी केली (जानेवारी १७६२). त्याचा पराभव झाला, पण उभयपक्षीं कोणास कांहीं देऊं नये असा तह राघोबानें केला, तो पुष्कळांस पसंत न पडल्यामुळें लवकरच माधवरावानें कारभार स्वतःच्या हातीं घेतला. पण तेव्हांपासून पुणें येथें कारभारांत दोन पक्ष उद्भवले. माधवरावांपुढें तीन मोठी कार्यें होती. पानपतच्या अपयशानंतर उत्तरेकडील व दक्षिणेकडील मराठी साम्राज्यांतील मुलुख शत्रूंनीं हस्तगत केला होता तो परत मिळविणें, आणि घरांतील राघोबाचें बंड मोडणें. याशिवाय शेजारीं निजामाचा बंदोबस्त करणें जरूर होतें. हातचा कारभार गेल्यावर लवकरच राघोबानें निजामाच्या साहाय्यानें लढाई केली, तींत माधवरावाचा पराजय झाला; ...

पानिपतचें युद्ध

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें         पानिपतचें युद्ध-  पानिपतास झालेली तिसरी लढाई. या प्रसंगाची सविस्तर हकीकत अन्यत्र येणार असल्यानें येथें फक्त तिचा थोडासा सारांश दिला आहे.  युद्धाचीं कारणें.-  अब्दालीनें १७५५ त नजीबखान यास दिल्लीच्या बादशाहीचा सेनापति केलें होतें. त्यास १७५७ त वजीर गाजीउद्दीनाच्या सांगण्यावरून राघोबादादा पेशवे यानीं पदच्युत केलें. सरहिंद येथें असलेल्या अब्दालीच्या सुभेदारास गाजीच्याच सांगण्यावरून दादानीं हांकलून पंजाब दुराण्यांच्या हांतून सोडविला (१७५८). गाजीच्याच सांगण्यावरून दत्ताजी शिंद्यानें नजीबखानावर रोहिलखंडांत स्वारी केली (१७५९). मराठयांचें वर्चस्व दिल्लीदरबारांत होऊन, पातशहा काढणें अथवा ठेवणें हा त्यांच्या हातचा मळ झाला. त्यांनीं मनांत आणल्यास  मुसुलमानी पातशाही खालसा करण्याची हिंमत त्यांच्या अंगीं होती ही गोष्ट मुसुलमान असह्य झाली. या कारणांनी ही लढाई किंवा भाऊगर्दी (ऑगस्ट १७५९ ते मार्च १७६१) पानपत येथें झाली. अब्दाली येतो.-  अब्दालीच्या मनांत मराठयांचा दिल्ली येलील वचरष्मा काढून तेथें आपली सत्ता स्थापावी...

पेशवेकालीन इतिहास

पेशवेकालीन इतिहास या ब्लॉगची निर्मिती करण्याचा मुख्य हेतू इतिहास संशोधन हा नसून,ऐतिहासिक घटनांचे संदर्भ साधनांच्या आधारे, कोणताही पूर्वग्रह अथवा पक्षीय दृष्टीकोन न बाळगता तटस्थवृत्तीने विश्लेषण करणे हा आहे !

शिवचरित्राचा गजानन मेहेंदळेंनी वैदिकवादी दृष्टिकोनातून केलेला विपर्यास

पेशवेकालीन इतिहास या ब्लॉगची निर्मिती करण्याचा मुख्य हेतू इतिहास संशोधन हा नसून,ऐतिहासिक घटनांचे संदर्भ साधनांच्या आधारे, कोणताही पूर्वग्रह अथवा पक्षीय दृष्टीकोन न बाळगता तटस्थवृत्तीने विश्लेषण करणे हा आहे ! शुक्रवार, ५ जून, २०२० शिवचरित्राचा गजानन मेहेंदळेंनी वैदिकवादी दृष्टिकोनातून केलेला विपर्यास बव्हंशी जीवन इतिहास अभ्यासात व्यतीत केलेली व्यक्ती केवळ हेतुतः ऐतिहासिक सत्याशी प्रतारणा करत विपर्यस्त इतिहास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांस प्रश्न   विचारण्याचे कटू असले तरी मुख्य कर्तव्य पार पाडणे आम्हांस भाग आहे. श्री. गजानन मेहेंदळे सरांचा इतिहास अभ्यास ,  अनुभव ,  ज्ञान पाहता ते या क्षेत्रातील केवळ तपस्वी ,  महर्षीच म्हटले पाहिजेत. परंतु परवा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आला व त्या सुमारे दीड तासांच्या भाषणात सरांनी ज्या प्रमाणे आपल्या कष्टाळू तसेच अभ्यासू वृत्तीचा परिचय जसा आम्हांस पुन्हा एकदा करून दिला , त्याचप्रमाणे त्यांचे एक इतिहास अभ्यासक ,  इतिहासकार म्हणून झालेलं नैतिक अधःपतन याची देहा याची डोळा पाहण्याचा योग आमच्या न...

प्रस्तावित मल्हार चरित्र कच्चा खर्डा ( भाग २ )

Image
पेशवेकालीन इतिहास या ब्लॉगची निर्मिती करण्याचा मुख्य हेतू इतिहास संशोधन हा नसून,ऐतिहासिक घटनांचे संदर्भ साधनांच्या आधारे, कोणताही पूर्वग्रह अथवा पक्षीय दृष्टीकोन न बाळगता तटस्थवृत्तीने विश्लेषण करणे हा आहे ! शनिवार, १६ मे, २०२० प्रस्तावित मल्हार चरित्र कच्चा खर्डा ( भाग २ )   प्रकरण - १    सदर प्रकरणास आधारभूत संदर्भग्रंथ :-  👉मराठी रियासत खंड १ ते ३ ,  मुसलमानी रियासत दोन्ही खंड ,   👉 सरकारकृत औरंगजेब चरित्र ,  👉 मनुची - असे होते मोगल ,  👉 शेजवलकरांचे निजाम पेशवे संबंध ,  👉 डॉ. खोबरेकरकृत महाराष्ट्राचा इतिहास दोन्ही खंड ,  👉 मुरलीधर अत्रे कृत  होळकर चरित्र , 👉 सेतू माधवराव पगडी संपादित मोगल दरबारची बातमीपत्रे शेजवलकर लिखित निजाम पेशवे संबंध पुस्तकातील निजामाचा आपल्या मुलांना उपदेशाधारे प्रकरणाचा आरंभ व पुनर्लेखन आवश्यक. 🔴मल्हारराव होळकराचा जन्म ,  बालपण ,  कौटुंबिक इ. तपशील पाहण्यापूर्वी आपणांस सर्वप्रथम तत्कालीन समाजाची राजकीय ,  सांस्कृतिक स्थिती समजावून घेणे भाग आहे. 👉 होळकरांचा उत्कर्ष प...