पेशवाईच्या काळातील घाशीराम कोतवाल हे काय प्रकरण आहे?
या नाटकाने महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ उडवला आणि इतिहास घडवला.
हे नाटक ब्राह्मणविरोधी आहे, त्यातून पेशावाईतील ब्राम्हणाची आणि त्यातही प्रामुख्याने नाना फडणीस यांची बदनामी झाली असल्याचे आरोप या नाटकावर झाले होते.
त्यावर बंदी घालावी, अशी मागणी आणि त्यासाठी आंदोलनेही झाली होती. आज ते सर्व विसरुन गेले आहे. परंतू
नाटकातील पात्र ही मात्र खरी असल्याने साहजिकच लोकांच्या मनावर नाना फडणवीस यांच्या चारित्र्याचा असा अतिशय वाईट ठसा उमटवला गेला आहे.
यातील दोन प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहेत त्या म्हणजे, नाना फडणवीस आणि घाशीराम कोतवाल .
एकंदर 'घाशीराम कोतवाल' या नाटकानंतर घाशीरामचा इतिहास लोकांसमोर आलाच नाही. आली ती फक्त दंतकथा.
मुळात बाजीराव पेशवे पासून ते माधवराव पेशव्यांच्या काळापर्यंत पुण्यास कोतवाल नावाचा प्रकार नव्हता.
नंतर शहराच्या सामाजिक सुरक्षते साठी कोतवाल म्हणजेच पोलिस अधिकारी नेमण्याची कल्पना पुढे आली.
👉 त्यानुसार 1764 रोजी माधवरावांनी बाळाजी नारायण केतकर यांच्याकडे पुणे शहराच्या व्यवस्थेचे काम सोपविले.
👉नाना फडणीस हे त्यांचे वरिष्ठ होते.
👉नाना फडणवीस क्सह सर्वात भरवसा ठेवला तो गुप्तहेर खात्यावर.
👉बारभाई असो रघुनाथ राव पेशवे असो नाना फडणवीस चे गुप्तहेर कलकत्ता पासून दिल्ली पर्यंत होते त्यावेळी कोतवाल चा उपयोग या साठी नाना फडणवीस ने करून घेतला.
👉फितुरी आणि गद्दारी वर लक्ष ठेवण्यासाठी नानांना घाशीरामच्या गुप्तहेरांकडून मिळणा-या बातम्यांचा चांगलाच उपयोग झाला आणि त्याबद्दल नाना बक्षिसे सेवन त्याची वारंवार स्तुती करीत .
👉1772 साली माधवराव यांचा देहान्त झाला आणि
👉1774 ला नारायणराव यांचा खून झाला,
👉राघोबा चे वाढते प्रस्थ ,
👉बारभाई मधला अविश्वास यामुळे कोतवाल या पदाचे महत्व खूप वाढले आणि भ्रष्टाचारपण.
♨️नानांच्या कारभारात कोतवालाचे प्रस्थ हळूहळू वाढले.
♨️शहराच्या बंदोबस्ताखेरीज गुन्हे, चो-या, व्यभिचाराची प्रकरणे, मद्यपान, जुगार यांसारखे गुन्हे रोखणे, याबरोबरच शहरातील बाजाराची व्यवस्था, वजनमापे, वाद्ये, हजाम, एवढेच नव्हे तर वेश्या यांची देखरेख, शहर स्वच्छता, रस्ते, इमारती, पाहुण्यांचा सत्कार, दानधर्म, दस्तऎवजाची नोंदणी अशी कितीतरी कामे कोतवालाकडे आली. त्यामुळे कोतवाल म्हणजे शहरातला मुख्य व महत्त्वाचा अंमलदार बनला.
घाशीराम कोतवाल चे घर(पुणे कॅम्प)
बाळाजी नारायण केतकरांनंतर
- बाबूराव राम
- जनार्दन हरी
- धोंडो बाबाजी
- आनंदराव काशी
असे कोतवाल झाले.
त्यानंतर काही करणावास्तव 1777 रोजी नानांनी घाशीराम कोतवालाची कोतवालपदावर नेमणूक केली.
👉घाशीराम कोतवाल हे आनंदराव काशी चे भाऊ.
पण त्यात काही व्यवहाराचा भाग पण असावा.रात्रीच्या वेळेस पुण्याच्या रस्त्यांवर शहरात येणार्या-जाणार्यांची कसून तपासणी, जागता पहारा, शहराची सुरक्षा, चोर्या-जुगार रोखणे, शहराची स्वच्छता इत्यादी कामे त्याच्या काळात व्यवस्थित केली जात होती, परंतू त्याच्या हातून एक चूक झाली की त्यामूळे तो एक मोठा गुन्हेगार आणि वेडा मनोवृत्तीचा कोतवाल आहे अशी पुढे जनसामान्यांची समजूत झाली.
पुण्यात राहणाऱ्या चार्ल्स मलेट यांनी जेम्स 'फोर्ब्स' ला हा किस्सा पत्राद्वारे सांगितलं आहे .
श्रावण महिना चालू होता, 1791 चा,
पुण्यात दक्षिण वाटप जोरात चालू होते. त्यावेळी पर्वती च्या खाली एक इमारत होती रमण म्हणून त्यात हे इटप चालायचे
याच दक्षिणेच्या अपेक्षेने त्यांच्या कारकीर्दीत 25 तेलंगि ब्राह्मण पुण्यास आले होते.
ते आपल्या देशास जाण्यास निघाले असता, त्यांना घाशीरामच्या शिपायांनी कैद केले आणि भवानी पेठेतील चावडीत खणाचे भुयार होते तेथे कोंडले.
त्या भुयारात वारा जाण्यास जागा नव्हती. त्यामुळे कोंडमारा होऊन 21 लोक मृत्यू पावले.
मानाजी फाकडे नावाच्या गृहस्थांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी ती पेशव्यांच्या कानी घातली.
21 ब्राह्मणांचा कोंडून मृत्यू झाल्याची बातमी पुण्यात कळताच एकच हलकल्लोळ उडाला.
पुण्यातील सर्व ब्रह्मवृंद पेशव्यांच्या वाड्यासमोर जमला.
अत्याचारी घाशीरामाला हत्तीच्या पायी देऊन ठार करावे, अशी त्यांची मागणी होती.
घाशीरामचे म्हणणे मात्र वेगळेच होते. कोंडून ठेवल्याने त्या ब्राह्मणांचा मृत्यू झाला, ही हकीकत खोटी आहे.
हे लोक शहरात चो-या करीत असत. त्यांना धरून आणून ठेवले असता, त्यांनी अफू खाऊन जीव दिला, असे त्याने सांगितले.
त्यावर त्या ब्राह्मणांना मूठमाती देण्याची परवानगी दिली. त्याबरोबरच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले.
त्यावेळचे पेशवे चे न्यायाधीश अय्याशास्त्रीजी यांच्याकडे चौकशीचे काम सोपविण्यात आले होते.
त्यांनी केलेल्या चौकशीत घाशीराम दोषी ठरला.
त्याच्या मुसक्या बांधून गारद्यांच्या पहा-यात ठेवण्यात आले.
👉घाशीरामला कैद केले तरी ब्राम्हणाचे समाधान झाले नव्हते.
👉त्याला हत्तीच्या पायी देण्याचा त्यांचा आग्रह होता.
👉तेव्हा त्याला हत्तीवर बांधून शहरातून फिरविण्यात आले.
👉त्यावेळी ब्राह्मणांनी त्याला दगड मारले.
👉 त्यात त्याचे डोके फुटले.
👉तरी ब्राम्हण लोक शांत होईना.
👉शेवटी दुस-या दिवशी, 31 ऑगस्ट 1791 रोजी त्याला उंटावर उलटे बसवून गारपिरावर नेऊन सोडल आणि मारले.
♨️घाशीराम कोतवाल विषयी दोन मतप्रवाह आहे काही जण म्हणतात की तो खूप प्रामाणिक होता तर काही जण म्हणतात की तो भ्रष्ट होता.
विजय तेंडुलकर यांनी आपल्या नाटकासाठी हेच रूप निवडले.
♨️घाशीराम कोतवाल माणूस सुस्वरूप, बुद्धिमान आणि गोडबोल्या होता. नाना फडणीसांची त्याच्यावर मोठी मर्जी होती.
♨️काहीजण असे म्हणतात की पण या काळात घाशीरामने अनेकांवर अन्याय केला. अतिशय निर्दयपणे पुण्याचा कारभार केला. त्यामुळे पुढे असा बदनाम कारभार 'घाशीरामी कारभार' म्हणूनच ओळखला जाऊ लागला. पण अखेर घाशीरामचे शंभर पापांचा घडा भरला.
काही जणांचे मत विरुद्ध आहे
🔴आतले राजकारण
👉रघुनाथराव पेशवे यांची खास मर्जी मानाजी फाकडे यावर होती.
👉नारायण राव पेशवे यांचा खून झाल्यावर तो भले बारभाई कडे परत आला.पण नाना फडणवीस चा त्यावर राग होता.
👉मानजीबापान योग्य संधी ची वाट पाहत होता.घाशीराम कोतवाल हा नाना फडणवीस चा माणूस.त्यामुळे ज्ञाने ही संधी सोडली नाही.पण बळी गेला घाशीराम कोतवाल चा.
👉मानाजी फाकडे हा गृहस्थ शिंदे घराण्यातील असून पानिपतच्या युद्धात शिंद्यांच्या घराण्यातील सर्व प्रमुख मंडळी मरण पावल्यावर शिंद्यांची सरदारकी महादजीला न देता या मानाजीस देण्याचा घाट रघुनाथरावने घातला.
👉मानाजी पराक्रमी असून रघुनाथरावास सामील असल्याने मराठी राज्याच्या सेवेत कमी पडला.
👉मानाजी फाकडे हा सरदार फार रुबाबदार व मर्दानी सौंदर्याचा नमुना असल्यामुळे त्याला फाकडा म्हणत.
👉त्यावेळी दोनतीन लोकांना फाकडा म्हणत.कॅप्टन स्ट्युअर्ट हा इंग्रज अधिकारी इस्टुर फाकडा म्हणून ओळखला जाई.[1]
👉छत्रपती शिवाजी महाराज आणि माधवराव पेशवे सोडले तर कोणताही मराठा आणी पेशवे प्रत्येकजण मग नाना फडणवीस असो नानासाहेब पेशवे असो, राघोबा पेशवे असो प्रत्येकजण नाटक शाळा बाळगून असो.
👉नाना फडणवीस ची अतिरिक्त विषयवासनेशिवाय त्यानां कोणताहि दुर्गुण नव्हता.पण तेवढाच दुर्गुण बरोबर वेचून ह्या नाटकाने नाना फडणवीस च्या कर्तृत्वावर मोठा अन्याय केलाय.
👉घाशीराम कोतवाल त्या काळी नानांचा लाडका होता आणि नंतर त्यांच्याच कारकिर्दीत मरण पावला.
👉 त्यामुळे त्याच्या वेगाने झालेल्या उदयानेआणि पतानामुळे पुढची पिढी ने मानाविषयी आणि घाशीराम कोतवाल विषयी अफवा पसरू लागल्या.
👉नानासाहेब पेशवे पासून दुसर्या बाजीरावांच्या कारकीर्दीपर्यंत या अतिशय बुद्धिमान आणि शिस्तप्रिय कारभार्यामूळेच इंग्रजांना मराठेशाहीत प्रवेश करता आला नाही तो केवळ नाना फडणवीसांमूळेच.पण नानफडनविस च्या एकचू दुर्गुणाचे वाभाडे काढून या महान माणसाला बदनाम झाले, बदनामी तेंडुलकरांनी केली नाही त्यापेक्षा सामान्य लोक जबाबदार आहे.
विजय तेंडुकर यांनी त्यावेळीच परिस्थितीचे वर्णन करून आताच्या परिस्थितीशी संगत लावली पण त्यांचा रोष बरोबर होता पण कळात नकळत नाना फडणवीस वर अन्याय झालाय.
चार्ल्स मलेट ची बायको अंबर कौर (चार्ल्स ने सुसना या स्त्री साठी तिला पुण्यात सोडून गेला , जाताना तीन मुले घेऊन गेला) हे चित्र जेम्स वेल्स ने काढले आहे 1792.
तळ टीप
1]THE STORY OF GHASHIRAM KOTWAL - A PROVOST OF PUNE
4]घाशीराम कोतवाल'चा पहिला प्रयोग... सूत्रधाराच्या नजरेतून !
तळटीपा
👉नाना उर्फ भानू फडणवीस हे इतिहासात गाजलेले व्यक्तिमत्व आहे. पण लोकांना हे माहीत नाही की त्या व्यक्तीचा खरा इतिहास काय आहे.
👉नाना फडणवीस हे भाऊसाहेबांपेक्षा १२ वर्षाने लहान होते. ते विश्वासराव यांच्या बरोबर वाढले.
👉भानू फडणवीस हे किरकोळ होते. लहानपणी स्त्री लंपट झाले, हे स्वतः त्यांनीच लिहिले आहे.
👉 त्यांना भाऊसाहेबांनी मंत्र दिला आणि स्वतःच्या वासना काबीज करायला सांगितले.
👉पुढे, पानिपत झाल्यावर, याच भानू चे महत्व वाढले. तो, १८ वर्षांचा भानू, जो पार्वतीबाई यांच्या मागे मागे फिरायचा,
👉माधवराव पेशव्यांच्या उजवा हाथ झाला.
👉कालांतरने तो पेशव्यांच्या स्त्रियांवर हुकुम गाजवे.
👉पार्वतीबाईसाहेबांच्या कडून मोहिमेच्या निमित्ताने खजिन्याच्या चाव्या काढल्या. ही गोष्ट माधवराव पेशवे ह्यांना आवडली नाही. पण त्यांच्या कडे दूसरे कोण नव्हते.
👉पुढे त्यांच्या मृत्यू नंतर, नारायणराव कडून सरदार गुप्ते ( विश्वासराव यांच्या पत्नी राधिकाबाई यांचे पिता) यांचा अपमान कुरून घेतला.
👉गोपिकाबाई ह्या भानू वर खुश होत्या, त्यांच्या जातीवादी वृत्ती चे त्या स्तुती करायच्या. ह्याच मुळे नारायणराव चा मृत्यू झाला.
👉नाना फडणवीस, यांनी हा आरोप राघोबा, आनंदी , सखाराम बापू बोकील, तुलोजी पवार आणि सरदार गुप्ते यांच्यावर केला.
👉पण त्याच सखाराम बोकीलला स्वतः बरोबर बारबाईच्या कौन्सिल मध्ये घेतले आणि शिक्षा माफ केली.
👉 बारबाई हे पेशव्यांची संपत्ती लुटण्याचे कौन्सिल होते.
👉म्हणून नाना फडणवीस नव कोट नाना झाला.
👉त्यांनी ९ लग्न केली,
👉तसेच सखाराम बोकील सुद्धा शेवट पर्यंत लहान लहान मुली बरोबर लग्न करत होता.
👉नाना फडणवीस ने पेणच्या सीकेपी जातीवर प्रतिबंध लावले व त्यांची संपत्ती जप्त केली.
👉पण स्वतःवर बालंट येवू दिले नाही.
👉त्या साठी "घाशीराम कोतवाल" सारख्या माणसांचा उपयोग केला.
👉 पुढे नाना, हा इतिहास बदलून टाकत. म्हणून, असा कोणी न्हवाता अशी नोंद केली.
👉भीतीने, कोणी हे कबुल केले नाही आणि फक्त गोष्ट राहिली. पुढे यावर नाटक आले, ते सुद्धा बंद पाडण्याचा यशस्वी प्रयत्न झाला.
माहिती चांगली, पण लेखनात अशुद्धता फार. सुधारणा हवी. क्षमस्व.
धन्यवाद, टाइपो आहेत improve करते
व्याकरण?
धन्यवाद! Typo, dictionary error . Edit madhye improve Karen.
♨️अमर्याद अधिकार आल्यानंतर एखादी व्यक्ती तिचा सारासार विचार हरवून बसते आणि असे निर्णय घेते जे इतरांना बाधक होतातच परंतु स्वतःलाही गोत्यात आणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घाशीराम कोतवाल.
👉घाशीराम हा औरंगाबादला राहणारा कनोजी ब्राह्मण,कामधंद्याच्या शोधात हा पुण्यात आला.
👉पुण्यात त्यावेळी गुन्हे वाढले होते,वेश्याव्यवसाय अनिर्बंध सुरू होता.फसवेगिरीला उत आला होता.
👉नाना फडणवीस यांनी अनैतिक प्रकारांवर अंकुश ठेवण्याच्या निमित्ताने सर्वानुमते शहरात कोतवाल नेमण्याचे ठरविले.
👉 सुरुवातीला कोतवाली आनंदराव काशी ह्या व्यक्तीकडे देण्यात आली.
👉आपल्या गोडबोल्या स्वभावाने आणि मिठासवाणीने प्रारंभी कोतवालच्या हाताखाली असलेल्या घाशीरामाने १७८२ मध्ये कोतवाल पद मिळविले.
👉लवकरच घाशीराम हा नानांचा महत्वाचा माणूस म्हणून गणला जाऊ लागला.
👉अधिकारपदास पोहोचल्याने
♨️त्याने त्याच्या पुणे शहर सुरक्षित कसे ठेवता येईल
👉यासंबंधी विचारविनिमय केला आणि
👉ठिकठिकाणी गुप्त पोलीस नेमले.
👉चौक्या उभारल्या,
👉हेरांचे जाळे तयार केले.
👉यामुळे वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात घाशीराम यशस्वी झाला.
👉पण पुढे जे घडले त्याबाबतीत घाशीराम दुर्दैवाचा बळी ठरला.
👉१७९१ मध्ये पुण्यातील तेलंगी ब्राह्मणांच्या २१ जणांच्या समूहाने माळ्याची परवानगी न घेता बागेतील फळे तोडली
👉(ती बाग खुद्द घाशीरामची होती असे काहींचे मत आहे)
👉माळ्याने ती तक्रार घाशीरामाकडे केली.
👉घाशीरामाने त्याच्या नोकरांना त्या सगळ्या तेलंगी ब्राह्मणांना पकडण्याचा आदेश दिला.
👉त्या सगळ्यांना भवानी पेठेतील एका भुयारातील खोलीत कोंडून ठेवण्यात आले.अशा भुयारात जेथे हवा येण्याजाण्यास कुठलीही खिडकी नव्हती.
👉राघोबादादाचा निकट मानाजी फाकडे यास ही गोष्ट समजल्यानंतर त्याने कुलूप तोडून त्या ब्राह्मणांना बाहेर काढले.
👉त्या एकवीस जणांपैकी १८ जण गुदमरून मेले होते,उरलेले ३ जण बाहेर काढल्यानंतर मेले.
👉ह्या घटनेने पुण्यात एकाच खळबळ उडाली.
👉ब्राह्मणांचे मोर्चे नानांच्या वाड्यावर धडकू लागले.
👉नानांनी घाशीरामला याचा जाब विचारला, त्यावर घाशीरामाने ते सगळे धाक दाखवून चोरी करणारे चोर होते असे यशस्वीपणे नानांना पटवून दिले.
👉नानांना ते पटले आणि त्यांनी त्या मृत ब्राह्मणांची प्रेते जाळण्याची परवानगी दिली.
👉पण राघोबादादाचा विश्वासू मानाजी फाकडेला नानांना कोंडीत पकडण्याची आयती संधी मिळाली होती ती तो कसा सोडेल.
👉त्याने जोपर्यंत ह्या मृत ब्राम्हणांच्या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत एकही प्रेत जाळले जाणार नाही अशी भूमिका घेतली.
👉एव्हाना हजाराच्या घरात तेलंगी ब्राह्मण पुण्यात वाड्यासमोर जमले होते.
👉तिथे मारामारी आणि दंगा सुरू झाला.
👉शेवटी नानांनी घाशीरामावर चौकशी बसविली.
👉 तेलंगी ब्राह्मणांच्या दबावाखाली अय्याशास्त्री नामक न्यायाधीशाने घाशीरामला देहांताची शिक्षा फर्माविली.
👉घाशीरामाची गाढवावरून धिंड काढण्यात आली,
👉त्याला शिव्यांची लाखोली वाहण्यात आली,
👉तेलंगी ब्राह्मण त्याच्यावर दगडफेक करू लागले.
👉घाशीराम आता पुरता रक्तबंबाळ झाला.
👉एका संतापलेल्या तेलंगी ब्राह्मणाने त्याला खाली पाडले आणि मोठा दगड उचलून घाशीरामाच्या मस्तकात घातला.घाशीराम जागीच ठार झाला.
👉त्यानंतरच ब्राह्मणांची प्रेते जाळण्यात आली.
👉सत्ताधारी आपले काम संपल्यानंतर कशा प्रकारे आपल्या हाताखालच्या लोकांचा काटा काढतात.हे इथे दिसून येते.
👉नानांशी अंतर्गत धुसफूस सुरू असलेल्या राघोबा दादाला नानांचा घाशीरामासारखा महत्वाचा माणूस नाहीसा करायचा होता,ती त्यांनी मानाजी फाकडेमार्फत पूर्ण केली.
👉नानांनीही घाशीराम प्रकरणात हस्तक्षेप केला नाही.मूग गिळून गप्प राहणेच त्यांनी पसंत केले.
👉घाशीरामपर्व अशा रीतीने संपुष्टात आले.
धन्यवाद!
♨️तेलंगी म्हणजे तेलगू का?
♨️हो,दक्षिण भारतीय द्रविडी ब्राह्मण यांना उद्देशून असे संबोधत असावे.जाणकार यावर जास्त प्रकाश टाकू शकतात.
♨️आज आपण ज्याला तेलंगण आणि आंध्र म्हणून ओळखतो, त्या प्रदेशातील. मातृभाषा तेलगू असलेले.
♨️प्रशांत जी, अभ्यास पूर्ण स्पष्टीकरण दिले. काही नावे अर्थात मानोजी फाकडे, हे पण इतिहासातील एक धुरंदर व्यक्तिमत्व होते, हे अजून पण बऱ्याच जणांना माहीत नव्हते. तसेच घाशीराम कोतवालाने ब्राह्मणांना त्रास दिला, पण 21 ब्राह्मणांची ही धरपकड पण आपल्या लेखातून स्पष्ट झाली.
अप्रतिम.
♨️पन यात नेमक यश व अपयश कूनाच हि डीबेट झाली पाहीजे.
👉नंतर मस्तानि प्रकरण बाजिरावने प्रेस्टीज समजल का हा पन पेशव्यान विचार करायला पाहीजेत का?
👉 कि शिवाजी महारांजानी जी स्टेप घेउन तत्कालीन पर स्त्री माते समान आदर्श जोपासने योग्य वर्तन ठरले अस्ते. शेवटी गजवाये हिंद चा भाग ठरला ?
👉आधी गजवा ये हींद किती गंभीर प्रकरन आहे हे प्रत्येक वाचकाने युट्यूब च्या माध्यमातून जानुन घेने हिताचे वाटते. मस्त वाटनारी दारू रामायनात कूठ उल्लेख आढळतो का ? क्रुपया टिपनी करावी.
♨️या घटनेची पुर्वपिठीका समजून घेण्यासाठी नाना फडणवीस हे पुण्याचे मुख्य कारभारी कसे झाले हे बघायला हवं.
👉राघोबादादा हे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे पुत्र. मात्र
👉नानासाहेब हे ज्येष्ठ व राघोबादादा हे कनीष्ठ पुत्र असल्याने
👉त्यावेळच्या प्रथेनुसार नानासाहेबांचा व त्यांच्या वारसांचा पेशवेपदावर हक्क राहीला.
👉राघोबादादांना पेशवेपदावर बसण्याची लालसा कायम राहिली.
👉त्यातून नारायणराव पेशव्यांचा खुन झाला.
👉 त्यावेळेस नारायणरावांस मुल झालेलं नव्हतं.
👉नारायणरावाची पत्नी ही त्यावेळेस गर्भारपण धारण केलेली असेल अशी पुसटशी कल्पना राघोबादादांना आली नाही.
👉पुण्यातील नाना फडणवीस वगैरे मुत्सद्दी मंडळींनी तीस पुरंदर किल्ल्यावर सुरक्षीत हलवलं व दैव असं की तिला पुत्र झाला.
👉हा पुत्र म्हणजे सवाई माधवराव वयाच्या ४० व्या दिवशी पेशवा झाला.
👉 परंतु, राज्यकारभार बराचसा नाना फडणवीस यांचे हाती आला.
👉नाना हे मुत्सदी होते पण लढवय्ये नव्हते.त्यामुळे कारभारावर आवश्यक ती पकड बसवण्यास कमी पडले असावेत व घाशीराम कोतवाल सारख्या व्यक्तीच्या हाती अनिर्बंध सत्ता आली.
👉बाजीराव पेशवे जसे घोडदौड करून मोठा पल्ला गाठत व यशस्वी लढाया करत तशी क्षमता राघोबादादांकडे होती.
👉 जर त्यांना पेशवेपद मिळालं असतं किंवा त्यांनी ज्येष्ठत्वाचा मान खुल्या मनाने स्विकारून अधिकृत पेशव्यांना सहकार्य केलं असतं तर इतिहास वेगळा दिसला असतां हे नक्की.
♨️शिरीष जी, एक पाऊल पुढे जाऊन, खुप छान माहिती आपण लिहिण्याचे कष्ट घेतले. विषय जुना असला तरी त्यातील नाविन्याची उकल झाली.
♨️धन्यवाद एकनाथजी. इतिहासातील बारकावे वाचले जात नाहीत व ते विस्मरणात जातात म्हणून हा खटाटोप. आपण वाचून प्रतीक्रीया दिलीत, धन्यवाद
♨️अभ्यासपूर्ण उत्तर !
पण शुद्धलेखनाचे १०० पैकी १०० गुण मिळाले !
(आजकाल , Quora वर तथाकथित नावाजलेले लेखक मराठी शुद्धलेखनाकडे जास्त लक्ष देत नाहीत म्हणून ही खास टिप्पणी )
♨️माझं शुद्धलेखन चांगलं नाही म्हणून हे उपरोधिक लिहीलेलं नाही ना अशी शंका आली
♨️खरंच लिहिलंय , जिथं चुकलं असेल तिथं नक्की सांगितलं असतं ..😊
♨️बहुवेळा keypadचा देखील दोष असतो.
चांगला मराठी keyboad बनविण्यात आपण कमी पडतो.
♨️मला असं वाटत नाही.
पुष्कळ वेळा शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष केलं जातं .
यात keyboard चा दोष कसा असेल ?
♨️घाशीराम कोतवाल नाटकाबद्दल ऐकून होतो परंतु आता माहिती मिळाली. आपला अभिप्राय वाचल्यानंतर नक्की केले संधी मिळाली तर नक्की बघणार.
♨️नक्की बघा!आणि बघितल्यानंतर तुमचा अनुभव आम्हाला टिपण्णीत सांगा!😊🙏
♨️घाशीराम कोतवाल या नाटकात घाशीरामला एक मुलगी असते. तीचे व नानाचे संबंध दाखवले आहेत, ते खरे ? की खोटे ?
♨️हो,हे खरे असावे,
👉नानांची एकूण नऊ लग्ने झालेली होती, शिवाय दोन रखेल्याही होत्या.
👉नानांचा स्त्रीलंपटपणा हेरून घाशीरामने त्याची मुलगी नानांना दिली होती आणि कोतवाली पदरात पाडून घेतली होती,पण पुढे त्या मुलीचा गर्भपातामुळे मृत्यू झाला.तेव्हापासून घाशीराम बेभानपणे वागू लागला होता.वरचे प्रकरण अशाच बेभाणपणातून घडले होते.
Comments
Post a Comment