लबाड्यांचा इतिहास
लबाड्यांचा इतिहास
इतिहासलेखन हे तटस्थ, निःपक्षपाती वृत्तीने केलेलेअसावे असा एक दंडक आहे. परंतु याचेच उल्लंघनसर्वाधिक केले जाते. कारण कोणतीही व्यक्ती शंभर टक्केनिर्विकार, तटस्थ राहूच शकत नाही. किंबहुना इतिहासहाच मुळी मानवी मनोविकारांचा गतकाळात घडलेला एकवृत्तांत आहे व इतिहासकार देखील एक मनुष्यचअसल्याने या मनोविकारांपासून अलिप्त राहूच शकतनाही. विशेषकरून आपल्या देशात तरइतिहासकारांवर मनोविकारांचा अत्याधिक पगडाअसल्याचे दिसून येते. त्यामुळे होतं काय कि, उपलब्धपुरावे समोर असूनही केवळ स्वतःच्या दुराग्रहापायीऐतिहासिक सत्य दुर्लक्षून व प्रसंगी विकृत करणारी विधानंकेली जाऊन इतिहासाचा व पर्यायाने देशाच्या वर्तमान,भविष्याचा सत्यानाश केला जातो.
शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाची ओळख आपणांसपाश्चात्त्यांकडून --- विशेषतः इंग्रजांच्या दीर्घ सहवासातूनझाली. तत्पूर्वीचं आपलं इतिहासलेखन काव्य, बखरी,पुराणे इ. पुरते मर्यादित असून त्यामागील मुख्य हेतूम्हणजे सत्ताधारी वा ज्यास उद्देशून साहित्यरचना केलीआहे, त्याकडून आर्थिक लाभ पदरात पाडून घेणे. यामुळेप्रसंगी सत्यकथनास आडफाटा दिला जात असला तरी जेकाही असत्यकथन केले जाई, त्यातून तत्कालीनसमाजीवनाचे एक धुरकट चित्र निर्माण होते. परंतु हे चित्रपुराव्यांची भर घालून स्पष्ट करण्याऐवजी विकृत केलं गेलंतर ?
यात अशक्य ते काहीच नाही. संत तुकारामांच्या एकाअभंगातील ' भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचेमाथी हाणू काठी ।। ' या सुप्रसिद्ध वचनाचे उदाहरण येथेदेणे चुकीचे ठरणार नाही. मूळ अभंगात हेच वचन ' भलेतरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊंमाथां ' असे असताना गाथा शुद्धीच्या नावाखाली संशोधकमहोदयांनी गांडीची तेथे कासेची योजना करत ' नाठ्याळाचि गांठी देऊं माथां ' ऐवजी ' नाठाळाचे माथी हाणू काठी 'असा बदल करत, एका ऐतिहासिक रचनेस विकृत करूनटाकले. या कृतीचा दुसरा परिणाम असा कि, संशोधकांनीकेवळ शुद्धीकरणाच्या नावाखाली गाथांमध्ये शाब्दिकफेरफार तर केलेच पण त्याऐवजी बनावट अभंग बनवूनदेखील घुसडले नाहीत कशावरून, या शंकेस देखील जन्मदिला.
हिंदू धर्मातील जातीयता तसेच स्पृश्य - अस्पृश्यतेचाइतिहास शोधण्याकरता संत साहित्याचा उपयोग होऊशकत होता, परंतु प्रक्षिप्तांमुळे ते साहित्य इतकं बदनाम वअविश्वसनीय झालंय कि सांगता सोय नाही. उदा :-नामदेवांच्या कथांमध्ये पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात बडवेअसल्याचा उल्लेख येत नाही. परंतु चोखोबांच्या अभंगातमात्र, चोखोबांनी मंदिर प्रवेश केल्याबद्दल बडवे त्यांनामारत असल्याचा उल्लेख येतो. आता चोखोबा व नामदेवतसे समकालीन. बरे, अस्पृश्यांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेशबंदी केव्हापासून झाली याचाही कोठेसमाधानकारक खुलासा नाही. कारण पेशवा सवाईमाधवराव रोजनिशी ले. क्र. ११२९ नुसार देवालयाच्याबाहेर उत्तरेच्या बाजूस चोखोबांचा दगड आहे तिथेअतिशूद्र दर्शनास येत, परंतु त्यांचा ब्राह्मणांस स्पर्श होतअसल्याने अतिशुद्रांनी चोखोबांच्या दीपमाळ किंवामहारवाड्यातील स्थळाहून पूजा करावी असा पुणेदरबारने स. १७८३ - ८४ दरम्यान आदेश काढला. परंतुयाच रोजनिशीत स. १७७४ - ७५ च्या ले. ९५६ नुसारपैठणच्या महादेव मंदिराच्या रक्षणार्थ ज्या चार पायदळशिपायांची योजना झालीय त्यात दोन महार आणि दोनमराठ्यांचा समावेश आहे. याचा मेळ कसा घालावा ?
या ठिकाणी आणखी एका गोष्टीची नोंद करणेअप्रस्तुत ठरणार नाही. स. १४७५ मध्ये बहामनी बादशहानेअंबरनाक याच्या नावे संपूर्ण महार समाजास ५२ हक्कांचीसनद दिली. याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी कि,मंगळवेढ्यास बहमनींचा दामाजीपंत हा कमावीसदारअसून त्याने त्यावर्षीच्या दुष्काळात सरकारी कोठारातीलधान्य गोरगरीब जनतेत वाटून टाकले. त्याची चुगलीबादशहाकडे होताच, बादशाहने दामाजीवर आर्थिक दंडबसवला, जो देण्याची दामाजीची ऐपत नव्हती. तेव्हाविठाजी / विठू नावाच्या महार व्यक्तीने आपल्याजवळीलसंपत्तीतून हा दंड भरून दामाजीची सुटका केली. बहामनीकाळापासून जेवढ्या सत्ता महाराष्ट्रात होऊन गेल्या, त्याप्रत्येक सत्तेच्या कार्यकाळात या सनदेची उजळणी झालीअसून त्याची एक नक्कल सातारकर छत्रपतींच्या दप्तरातसापडल्याचे इतिहास संशोधक श्री. वि. का. राजवाड्यांनीनमूद केलं आहे.
तात्पर्य, अस्पृश्यता व अस्पृश्य समजल्या जाणाऱ्याजातींची सामाजिक गुलामगिरी याचा खरा इतिहासअद्यापही उजेडात येणे बाकी आहे.
मूळ ऐतिहासिक संदर्भ साधने संपादून ती प्रसिद्धकरताना भाषा व शब्दरचना मूळ स्वरूपानुसार जशीच्यातशी छापणे बंधनकारक असते. मग पाहिजे तर त्यावरशुद्ध - अशुद्धतेच्या तळटीपा वा स्वतंत्र प्रकरणे लिहिलीजाऊ शकतात. परंतु आपल्या इतिहास संशोधकांनी यानियमासही कित्येकदा गुंडाळून ठेवलं आहे.
श्री. वासुदेव कृ. भावे लिखित ' मुसलमानपूर्वमहाराष्ट्र ( खंड १ ला ) ' या ग्रंथात त्यांनी शिलालेखांतमूळ शब्दांचे कृत्रिम संस्करण काही ठिकाणी दिले आहे.जसे - नाशिकच्या आनंद शेठीचा पुत्र पुष्यनाक ( बेडसेलेख १ ला ). परंतु श्री. शांताराम भालचंद्र देव संपादित 'महाराष्ट्र व गोवे शिलालेख - ताम्रपटांची वर्णनात्मकसंदर्भ सूची ' नुसार वास्तविक नामवाचक शब्द आहेपूसणक. अर्थात, त्याविषयीही साशंकता आहे. कारणसंशोधकांनी कित्येक ठिकाणी मूळ शब्दोच्चार जसेच्यातसे न ठेवता त्याचे संस्कृतकरण केले आहे.
उदा :- ' महाराष्ट्र व गोवे शिलालेख - ताम्रपटांचीवर्णनात्मक संदर्भ सूची ' मध्ये कार्ल्यातील एकालेखावर ' गृहस्थ महादेवणक ' नाव असल्याचे दिलेआहे तर भाव्यांच्या ' मुसलमानपूर्व महाराष्ट्र ' मध्ये 'गृहपति महादेव नाक ' असे रूप दिलं आहे. प्रश्न असाआहे कि यातील मूळ रूप कोणते ? शिलालेख अनेककारणांनी काळ उलटेल तसे वाचण्यास अवघड होऊनजातात. अशा स्थितीत त्यांचे वाचन केल्यावर मूळ रूपेजशीच्या तशी ग्रंथीत करून ठेवण्याची जबाबदारीकोणाची आहे ? आणि याचे पालन कसे केले जाते याचाहा एक नमुना आहे.
मूळ प्राकृत शब्दांचे निष्कारण संस्कृतकरण केल्यानेअर्थाचा अनर्थ होऊन इतिहासाची हानी होते. कारण,यामुळे प्राकृत या अभिजात भाषा असून संस्कृत हिकृत्रिम व अलीकडच्या काळातील भाषा असल्याचेऐतिहासिक सत्य एकीकडे दडवीत असताना दुसरीकडेसंस्कृतच्या साहाय्याने शब्दांचे वाटेल तसे अर्थ फिरवूनआपल्याला सोयीस्कर अशी इतिहासाची मांडणी करतायेते.
उदा :- वैदिक धर्मियांच्या ग्रंथांत येणारा ' शूद्र ' हावर्णवाचक शब्द. याची व्युत्पत्ती, अर्थ संस्कृत भाषेतशोधूनही सापडणार नाही. मूळ प्राकृत शब्दाचा पत्ता मुद्दाकाही राखला नाही. येऊन जाऊन ग्रीक इतिहासकारांच्याकृपेने शूद्र नामक टोळ्या पश्चिमोत्तर हिंदुस्थानात -- सिंधप्रांतात राज्य करत असल्याचे उल्लेख मिळतात. तसेचमहाभारतातही या टोळ्यांच्या राजवटीचे उल्लेख आहेत.
येथे आपण नमुन्यादाखल मनुस्मृतीचे उदाहरण पाहू.मुळात या स्मृत्या रचल्या गेल्या स्थानिक प्राकृत भाषांत.ज्याचे पुढे संस्कृत रूपांतर झाले. परंतु या दरम्यानच्याकाळात व त्यानंतरही या स्मृत्यांचे संरक्षण - संवर्धनवैदिकांनीच केले. परंतु हे करत असताना मूळ नियमजसेच्या तसे ठेवल्याने त्यात परस्परविरुद्ध वचनांचागोंधळ दिसून येतो. तसेच स्मृतींचा अमुक अध्याय अमुकविषयापुरता मर्यादित आहे अशातलाही भाग नाही.कोणत्या अध्यायात कोणते श्लोक यावेत याचाही धरबंदनाही. त्यामुळे त्यात विस्कळीतपणा पुष्कळ आहे. परंतु हाविस्कळीतपणा दूर करण्याऐवजी वैदिक धर्मियांची ' आर्यसमाज ' संस्था विशुद्धीकरणाच्या नावाखाली स्वतःलाअडचणीचे भासणारे मूळ मनुस्मृतीतील श्लोक उडवूलागले आहेत. उदा :- अध्याय क्र. ५ मधील श्लोक क्र. ३०- ५६ हा वैदिकांत प्रचलित मांसाहाराची पुष्टी करणाऱ्यावचनांचा जसा संग्रह आहे तद्वत मांसाहार वर्ज्य मानण्यासआरंभ झालेल्या काळाचाही प्रतिनिधी आहे. मनुष्यजीवनआरंभ झाले तेव्हापासून तो मांसाहारी आहे. त्यामुळेवैदिक धर्मात मांसाहार निषिद्ध होता अशातला भाग नाहीव अद्यापही त्यांच्यात त्याविषयी काही अपवाद वगळताकाटेकोर नियम पाळले जातात असे नाही. तरीही आमच्यावैदिक धर्मीय मित्रांनी विशुद्धीकरणाच्या नावाखालीस्वहस्ते स्वधर्माचा प्राचीन इतिहासच पुसून टाकण्याचीमोहीम आखल्याचे येथे खेदपूर्वक नमूद करावे लागते.
उपलब्ध असलेले ऐतिहासिक पुरावे नष्ट करणे, विकृतकरणे हा खेळ कित्येक वर्षे अव्याहतपणे चालू आहे वयामुळे आपला इतिहास कमालीचा दूषित बनला आहे.उदा :- आमच्या इतिहास संशोधकांवर आपापल्या धर्माचाजबरदस्त प्रभाव आहे. आपापल्या धर्मास अनुलक्षूनगौरवार्थ एखादा उल्लेख आढळला कि त्या राजवटीस,राजास आपल्या धर्माचे लेबल लावून टाकायचे. यातूनचमग कनिष्क बौद्ध होतो, सातवाहन वगैरे वैदिक ठरतात.बरं होतं काय कि, यांचे ग्रंथ संदर्भ साधनांच्या आधारेसजलेले असतात व कालानुरूप ते सर्व संदर्भ नंतरच्याअभ्यासकांस उपलब्ध होतातच असे नाही. तेव्हाआधीच्या संशोधकांची मते प्रत्यंतर पुराव्याच्याअनुपलब्धतेमुळे, केवळ त्यांच्या संशोधन कार्याकडे बघूनस्वीकारावी लागतात. त्यामुळे अंधानुकरणाची एक नसंपणारी मलिकाच बनून त्यावर समाजमन पोसले जाते.
उदा :- संस्कृत हि प्राचीन अभिजात भाषा असल्याचेइतकी वर्षे ठामपणे सांगत समाजमनावर ठसवले. परंतुवस्तुस्थिती काय आहे ? संस्कृत हि पाली प्रमाणेच निर्माणकेलेली भाषा आहे. या भाषेला स्वतःची लिपी नाही.संस्कृत भाषेतील सर्वात जुना शिलालेख गिरनार येथे प्राप्तझाला असून त्याचा काळ इ. स. १५० नंतरचा ठरवण्यातआला आहे. तसेच हा लेखही संस्कृत + प्राकृत असा मिश्रस्वरूपात असून लिपी ब्राह्मी आहे. यापूर्वीचा संस्कृतभाषेतील एकही लेख अद्याप प्राप्त झाला नाही. तसेच हिवैदिकांची भाषा आहे, या समजाला कसलाही आधारनाही. या भाषेत सर्वांचा -- हिंदू, बौद्ध, जैन, वैदिक इ. चासमावेश आहे व सर्वधर्मियांनी प्रसंगी या भाषेत विपुललेखनही केलेलं आहे. याचा कसूर अर्थ असा होतो कि,आपल्या प्राचीन इतिहासाचे पुरावे संस्कृत ऐवजीपुराप्राकृत भाषांत लिहिलेल्या शिलालेख, ताम्रपट,दस्तऐवजांत सर्वाधिक असून त्यातील बरेचसे कालौघातनष्ट झाले वा केले गेले, तर उर्वरित केवळ आपल्याउदासीनतेमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
स्वतःला अडचणीचे भासणारे अस्सल ऐतिहासिकपुरावे नष्ट करण्याची देखील आपल्या संशोधकांत एकमहान परंपरा आहे. या संदर्भात आचार्य अत्र्यांनी आपल्याआत्मचरित्रात ( कऱ्हेचे पाणी ) दिलेला नानाफडणवीसच्या रक्षांच्या नावाची यादी खाऊन टाकणाऱ्याइतिहास संशोधकाचा किस्सा वाचकांच्या समरणातअसेलच. अशा प्रकारे कित्येक कागद या दिव्यसंशोधकांनी गायब केले असतील याचा आजघडीला पत्तानाही. याच संदर्भात प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या 'ग्रामण्यांचा इतिहास ' या ग्रंथातील पुढील दोन उल्लेखमहत्त्वाचे आहेत :- (१) या ग्रंथाचे प्रकाशक आपल्याप्रास्ताविकात लिहितात -- ' ... सावित्रीबाईठाणेदारणीला कोणी कायस्थ ज्ञातींतून चित्पावनज्ञातीत ढजलीत आहेत. कोणी तिला कादंबरीतीलनायिका म्हणत आहेत, कोणी नाना फडणीसांच्याअंत:करणाच्या खाणीतून कोहीनुरांचे ढीगच्या ढीगबाहेर काढीत आहेत, कोणी त्यांच्या मनोमयभूमिकेवर नक्षीदार गालीचे पसरविण्याच्या गडबडीतआहेत, कोणी गोपीनाथ पंत बोकीलाला शिवाजीचीचिटणीशी वतन बहाल देण्याच्या धामधूमीत आहेत,कोणी हेमाडपंतालाही ब्राह्मणी पोशाख चढविण्याच्यातजविजीत आहेत; तर कोणी मराठया आठवल्यालाचित्पावनी बाप्तिस्या देण्याच्या खटपटीत आहेत.असा मोठा ऐतिहासिक क्रांतीचा काळ आलोलाआहे. ' स. १९१९ च्या काळातील हि स्थिती आहे.
(२) शिवकालीन कागदपत्रे का उपलब्ध होत नाहीतयाविषयी चर्चा करताना प्र. ठाकरे लिहितात -- ' ... याकोडयाचा उलगडा व्हावा म्हणून शोध करीतअसतांना छत्रपतीच्या चिटणीसाच्या एका पत्राचीनक्कल उपलब्ध झाली, त्यांत चिटणीसांनी स्पष्टलिहिलं आहे कीं आम्हांला तुरुंगात टाकल्यावरचिंतामणराव पटवर्धाच्या चिथावणीवरुन बाळाजीपंतनातूनें आमचें घरदार लुटविलें आणि अठरा उंट भरुनघरांतील सर्व कागद पत्र नेऊन जाळून फस्त केले. '
उपलब्ध ऐतिहासिक पुरावे विकृत करण्याचीउदाहरणेही काही थोडी थोडकी नाहीत. उदा :- वि. का.राजवाड्यांच्या ' मराठ्यांच्या इतिहासाची साधने (१७५० पासून १७६१ पर्यंत ) ' मधील ले. क्र. १.
हा लेखांक म्हणजे दिल्लीच्या तुर्की बादशहा सोबतपेशव्यातर्फे होळकर - शिंद्याने केलेल्या मूळ संरक्षककराराची मराठी नक्कल असून यात प्रामुख्याने फार्सीशब्दांचा वापर केलेला आहे. याचा सारांशरुपी मराठीअनुवाद राजवाड्यांनी तळटिपेत देताना आपल्या वैदिकधर्माची कारण नसताना मेख मारून ठेवली आहे.
करारातील मूळ वाक्यरचना --- श्री महादेव व खडेराव वधर्म व आईन आपले दरमीयान व जामीन आहेत.
राजवाडे कृत अनुवाद --- श्रीमहादेवाची व खडेरावाचीव धर्माची व स्मृतीची शपथ व साक्ष तुह्मा आह्मासआहे.
मूळ करारात स्मृती हा शब्दच नसताना राजवाड्यांनीआईन या फार्सी शब्दाचा मराठी अनुवाद स्मृती केला.वास्तविक आईन या शब्दाचे कायदा, विधान, पद्धती,नियम, रीत, प्रथा, परंपरा, रिवाज इ. अर्थ होत असतानाहीराजवाड्यांनी मुद्दाम सहेतुक स्मृती या वैदिक धर्मविशेषशब्दाची योजना करत एकप्रकारे तत्कालीन वैदिक धर्मासनसलेली महत्ता कागदोपत्री देण्याचे, वाचक वअभ्यासकांची दिशाभूल करण्याचे पाप गाठीस जोडलेआहे.
इतिहासकाराने इतिहास लेखन करताना आपल्यामनोविकारांना बाजूला ठेवून इतिहासलेखन करायचेअसते. एकप्रकारे न्यायाधीशाच्या भूमिकेतच त्यास जावेलागते. परंतु मराठी इतिहासकारांनी या तत्त्वास पूर्णतःहरताळ फासला आहे. पेशवाईचा इतिहास याचे समर्पकउदाहरण आहे.
राजवाड्यांपासून शेजवलकरांपर्यंत ज्या ज्याइतिहासकाराने पेशवाईतील पानिपत प्रकरण हाती घेतलं.त्याने पानिपतच्या पराभवास मल्हारराव होळकरासजबाबदार धरले. वास्तविक उपलब्ध कागदपत्रे, तत्कालीनदरबारी राजकारण पाहिले तर पानिपतच्या अरिष्टास खुद्दत्रिवर्ग पेशवे बंधू -- नानासाहेब, रघुनाथराव आणिसदाशिवराव कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसून येते. पणहोतं काय ? तर होळकराने रघुनाथरावास अब्दालीच्यामुकाबल्यास जाऊ दिले नाही, होळकराने पंजाबच्याबंदोबस्तात मन घातले नाही, होळकराने दत्ताजीला धोतरबडवी सल्ला दिला, होळकर इब्राहिमखान गारदीचा द्वेषकरत होता इ. इ. यातील एकही बाब कागदोपत्री सिद्धहोत नाही.
अस्सल कागदपत्रे जे सांगतात त्याविपरीत अनुमानकाढून ते ओघवत्या भाषेत मांडल्यावर, सर्वसामान्यवाचकांच्या उड्या त्या अनुमानरचित इतिहासावर पडणेस्वाभाविक आहे व तसे घडतेही. उदा :- मराठीरियासतीच्या निग्राहक माधवराव या खंडात स. १७६५मध्ये झालेल्या होळकर - इंग्रजांच्या दरम्यान काल्पी येथेझालेल्या लढाईची अस्सल पत्राधारे रियासतकारसरदेसाईंनी चर्चा केली असून त्या पत्रामध्येआप्पाजीरामाने स्पष्टपणे लिहिलंय कि, ".. इंग्रजकाल्पीत ठाणे बसवून माघारे गेले. आम्ही उलटोनत्यांचे ठाणे काढून आपले ठाणे बसविले. तेथूनउमरगडचा बंदोबस्त करून ग्वाल्हेर प्रांती चाललोआहों. " तरीही रियासतकार लिहितात -- याप्रमाणेहोळकरास इंग्रजांपुढे माघार घ्यावी लागली. त्यांसहुसकून देणे तर दूरच, परंतु उलट त्यांनीमल्हाररावासही टिकू दिले नाही.
होळकरांच्याच संबंधाने लक्षात आलेली आणखी एक बाबम्हणजे, दुसऱ्या बाजीरावाच्या काळात यशवंतरावहोळकराने पुणे शहराची लूट, जाळपोळ केली असा एकइतिहासकारांनी त्याच्यवर बिनबुडाचा आरोप केला आहे.वस्तुतः पुणे शहरातून खंडणी वसुलीचे काम अमृतरावपेशव्याच्या आज्ञेने त्याचा सरदार हरिपंत भावे करत होताव त्याने मदतीसाठी यशवंतरावाची काही पथके सोबतघेतली होती. खेरीज होळकर पुणे सोडून गेल्यावरअमृतरावाने शक्य तितकी शहरात लूटमार केली. परंतु सर्वखापर फुटले ते यशवंतराव होळकरावर !
कृत्रिम, बनावट पुरावे निर्माण करून त्याआधारेइतिहासलेखन करणे हाही प्रकार आपल्या संशोधकांनीकेलेला आहे. उदा :- सिंधू संस्कृती अज्ञात होती त्यावेळीआर्य आक्रमण सिद्धांताच्या आहारी गेलेले वैदिक धर्मीय,सिंधू संस्कृती उजेडात येताच आपणच तिचे निर्माणकर्तेअशा कोलांटउड्या मारू लागले. आपल्या धर्मग्रंथात --ऋग्वेदात यासंबंधी काही पूरक पुरावे आढळतात का,याचा ते शोध घेऊ लागले. त्याशिवाय काही वैदिकविद्वानांनी असत्याचा आश्रय घेत सिंधू संस्कृतीच्या लिपीचेवाचन केल्याचा व ती लिपी वैदिक संस्कृत असल्याचाहीदावा करत जगभर खळबळ माजवली होती. तसेच एन.एस. राजाराम व एन. झा यांनी सिंधू संस्कृती वैदिकआर्यांचीच, हे सिद्ध करण्यासाठी सिंधू संस्कृतीतील एकाअर्धवट तुटलेल्या मुद्रेला -- ज्यावर एकशिंगी बैलाचीप्रतिमा होती -- संगणकीय आधाराने पूर्ण करत बैलाचाघोडा करून टाकला. कारण, वैदिक आर्यांच्या जीवनातघोड्याला अनन्यसाधारण महत्त्व असून सिंधू संस्कृतीतघोडा असल्याचा एकही पुरावा मिळत नव्हता. परंतुहार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचेसहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी एन. एस. राजाराम व एन. झायांचा उपरोक्त पोकळ दावा म्हणजे चक्क भूलथापअसल्याचे साधार सिद्ध केले.
मनुस्मृती अध्याय २, श्लोक क्र. १७ - २२ नुसारवैदिकांचे मूळस्थान म्हणजे सरस्वती व दृषद्वती या दोननद्यां दरम्यानचा ब्रम्हावर्त होय. भौगोलिकदृष्ट्या हे स्थानदक्षिण अफगाणिस्तानात येते व सरस्वती नदी आजहीतिथे हेल्मन्ड नावाने प्रवाही आहे. परंतु हे सत्यजाणूनबुजून दुर्लक्षून हरियाणातील मोसमी नदीला --घग्गर हाक्रा नदीला सरस्वती नदी ठरवण्याचा खटाटोपसध्या सुरु आहे. या नदीच्या खोऱ्यातच आपला धर्म -संस्कृती निर्माण झाल्याचे सांगत सिंधू संस्कृतीच्यानिर्मितीचे व त्यासोबत हिंदू धर्माच्या पितृत्वाचेही श्रेयसंपादण्याचा खेळ वैदिकांनी आरंभला आहे. यासंबंधीविस्तृत व साधार विवेचन श्री. संजय सोनवणींनी आपल्या' हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास ' या ग्रंथातकेले असून जिज्ञासूंनी तो अवश्य वाचून पाहावा अशी मीशिफारस करतो.
वैदिकांच्या वर्चस्ववादाची हाव एवढी कि, त्यांनीहिंदूंच्या शिवलिंगाचा भ्रामक आधार घेत काबा यास्थळावरही आपला दावा सांगत ख्रिस्ताचेही कृष्ण रूपकरून टाकले.
अशा या थापेबाजीच्या इतिहासाची तितकीच जोरदारप्रतिक्रिया होणे स्वाभाविक होते व ती तशी झालीही.आरंभी ब्राह्मण - ब्राह्मणेतर ते नंतर बहुजन, मूलनिवासी,आर्य - द्रविड अशी साहित्य संघर्षाची मांडणी झाली.
प्रथम नांदी म. फुल्यांनी केली. त्यानंतर यात भरचपडत गेली. वैदिकांचेच साहित्य वापरून त्यांना त्यांच्याचभाषेत उत्तर देण्याचं कार्य या आघाडीवर झालं खरं, परंतुत्यामुळे भारताच्या इतिहासात कितपत मोलाची भरपडली ? हा खरा प्रश्न आहे. भारतावरील इंग्रजी राजवटीचेअनेक भले बुरे परिणाम असले तरी त्यातील एक चांगलापरिणाम म्हणजे इंग्रजांमुळेच वैदिकांची लबाडी प्रथमतःउघडकीस आली. येथील भाषा, संस्कृती, इतिहास जाणूनघेण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला -- ज्यास वैदिकचसहाय्य्यभूत झाले -- त्याद्वारे भ्रष्ट स्वरूपात का होईनावैदिकाळलेला इतिहास हिंदूंच्या समोर आला वआत्मचिंतनातून त्यांना त्यातील विकृत भागाचे दर्शन घडूनशुद्ध स्वरूपाचे थोडेबहुत ज्ञान झाले. अर्थातशतकानुशतकांचे समज, मनातील न्यूनगंड एक दोनपिढ्यांत दूर होणारे नसले तरी त्या दिशेने झालेली सुरवातनक्कीच स्वागतार्ह आहे !
Comments
Post a Comment