कुंभेरीचा वेढा व खंडेराव होळकराचा मृत्यू

कुंभेरीचा वेढा व खंडेराव होळकराचा मृत्यू




    इतिहास लेखन हे पूर्वग्रहदूषित नसावं असा एकदंडक आहे. परंतु कित्येकदा असं आढळून आलं आहेकि, या नियमाचा विसर भल्या भल्या नामवंतइतिहासकारांना प्रसंगोत्पात पडला आहे. याबाबतीतअनेक उदाहरणांपैकी एक म्हणजे कुंभेरीचा वेढा वखंडेराव होळकराचा मृत्यू !

    नानासाहेब पेशव्याचा धाकटा भाऊ रघुनाथरावउर्फ दादासाहेबाची पहिली हिंदुस्थान सवाई कुंभेरीच्यावेढ्यामुळे इतिहासात प्रसिद्ध आहे. या मोहिमेचे मुख्यउद्दिष्ट, प्रयोजन आणि तिचा फलितार्थ याविषयीसरदेसाई, शेजवलकर इ. मराठी तसेच जदुनाथसरकार सारखे अमराठी इतिहासकार लेखन करतानाकुठेतरी प्राप्त पुरावे नाकारून सर्वसामान्यतःरघुनाथराव, मल्हारराव इ. विषयी प्रचलितगैरसमजांच्या आहारी गेल्याचे दिसून येते. परिणामी,कुंभेर स्वारी अथवा दादासाहेबाची प्रथम हिंदुस्थानमोहीमच नव्हे तर पुढे घडून आलेल्या पानिपतच्याआकलनातही हि दिग्गज मंडळी कमी पडतात वयांच्या मळलेल्या वाटेने जाणाऱ्या तरुण इतिहाससंशोधक, अभ्यासकांचीही हटकून फसगत होऊन तेदेखील तोंडघशी पडतात !
    
    प्रस्तुत लेखामध्ये आपणांस कुंभेरी मोहीमउद्भवण्याचे कारण व खंडेराव होळकराच्या मृत्यूची,प्रकाशित परंतु दुर्लक्षित संदर्भ साधनांच्या आधारे चर्चाकरायची आहे.

    स. १७५२ मध्ये बादशाह व पेशव्यातर्फे शिंदे -होळकरांत घडून आलेल्या तहानुसार पेशव्याला तुर्कीबादशाहकडून अजमेर व आग्रा या दोन सुभ्यांचीसुभेदारी प्राप्त झाली होती. पेशव्याने आपल्यावतीनेशिंद्यास अजमेर तर होळकरास आग्रा देऊ केले. पैकीशिंद्यास मिळालेल्या अजमेरात मारवाडकर बिजेसिंगठाण मांडून बसला होता तर आग्ऱ्यास जाट प्रबळहोता. अशा स्थितीत हे दोन सुभे आपल्या ताब्यातघेण्यासाठी पेशव्याने रघुनाथरावासह शिंदे -होळकरांना हिंदुस्थान प्रांती रवाना केलं व त्यातूनकुंभेरीची मोहीम उद्भवली अशी एक सामान्यतःमांडणी आजवर मराठी इतिहासकारांनी केली आहे,करत आहेत, ज्याला पानिपत असे घडले ' चे लेखनकरतेवेळी मी देखील अपवाद नव्हतो.

    जदुनाथ सरकार लिखित व ग. श्री. अनुवादित 'मुघल साम्राज्याचा ऱ्हास, भाग - १ ' या ग्रंथातकुंभेरी स्वारीची खरी कारणे स्पष्टपणे नमूद केलीअसून त्यान्वये :- अयोध्येचा नवाब सफदरजंग आणिदिल्लीचा तुर्की बादशाह अहमदशहा यांच्यात स.१७५३ च्या मार्च ते नोव्हेंबर मध्ये प्रथम राजकीय वत्यानंतर सशस्त्र संघर्ष उद्भवून त्यात सफदरजंगासजाट राजा सुरजमलने मदत केली तर हिंदुस्थानातीलउर्वरित संस्थनिक तटस्थ राहिले वा बादशाही पक्षासमिळाले. पुढे जयपूरच्या माधोसिंगास मध्यस्थीसआणून बादशहा - सफदरजंग यांच्यात समझोताघडवून आणण्यात आला. परंतु बादशाहचा मीरबक्षीइमादउल्मुल्क यास हा तह मान्य नसून त्यालासफदरजंग आणि त्याचा मित्र सुरजमल यांचा पुरतानाश घडवून आणायचा होता. सबब त्याने मराठीसरदार शिंदे - होळकर आणि त्यांचा सेनापतीरघुनाथराव यांच्याशी संधान बांधून त्यांना कुंभेरीवरस्वारी करण्यास उद्युक्त केले.  त्याबदल्यात त्यांनाजाटाकडून मिळणाऱ्या संपत्तीतील निश्चित एक वाटादेण्याचे मान्य केले.

    रघुनाथरावास पेशव्याचे कर्ज फेडण्याकरता तसेचसैन्याचा खर्च भागवण्यासाठी पैशांची निकडअसल्याने त्याने हि मोहीम स्वीकारली. शिवायइमादउल्मुक उर्फ धाकटा गाजीउद्दीन हादख्खनमधील हैद्राबादच्या निजामाचा वंशजअसल्याने दक्षिणेत पेशव्याला नडणाऱ्यानिजामबंधूंवर दाब ठेवण्यासाठीही त्याचा उपयोगहोणार होता. सारांश, बादशाही मदतीच्या नावाखालीइमाद आणि रघुनाथरावाने संगनमताने हे कुंभेरीचेराजकारण शिजवले.

    याला आणखीही काही बाजू आहेत. स. १७५२मध्ये तत्कालीन वजीर व अयोध्येचा नवाब सफदरजंगयाच्या विद्यमाने दिल्लीचा तुर्की बादशहा वपेशव्यातर्फे शिंदे - होळकरांच्या दरम्यान एक तहघडून आला, ज्यानुसार तुर्की बादशाहीचे अंतर्बाह्यशत्रूंपासून रक्षण करण्याचे मराठी सरदारांनी मान्यकेले. याबदल्यात पेशव्याला अजमेर आणि आग्रासुभ्याची सुभेदारी प्राप्त झाली. पैकी, पेशव्याने आग्राहोळकरास तर अजमेर शिंद्याला देऊन टाकले. आताआग्र्याच्या सुभ्यातच जाटांचे बलवान राज्य उदयासआल्याने होळकरास, पर्यायाने पेशव्याला त्याच्यावरशस्त्र उचलणे भाग होते.

   आता या राजकारणाची तिसरी बाजू म्हणजेबादशहा अहमदशाह व त्याचा विद्यमान वजीरइंतिजामउद्दौला. पैकी, इंतिजाम हा मीरबक्षी इमादचानातलग -- चुलत चुलता असून त्याचे आणि इमादचेआपसांत काहीतरी कारणावरून वैमनस्य होते आणिया दोन वजनदार उमरावांतील वैरामुळेच पुढीलराजकारणास निराळे वळण लाभत गेले.

    इंतिजामउद्दौलाचे बादशाहवर विशेष वजन असूनस्वतः बादशाह आपल्या अधिकारांच्या बाबतीतजागरूक असला तरी निर्णयक्षमतेच्या बाबतीत तोदुर्बल होता. त्यामुळे दिल्ली दरबारातीलराजकारणाची दिशा उमरावांच्या चलतीनुसार बदलतजाऊन त्यास स्थिरता कधीच आली नाही.
    इंतिजामउद्दौला आपल्या वडिलांचे, माजी वजीरकमरुद्दीनखानाचे धोरण -- मराठी सैन्याला नर्मदेपार हाकलून लावण्याचे, कधीच विसरला नाही. त्यामुळेसफदरजंगच्या पश्चात त्याच्याकडे वजिरी येताच त्यानेहिंदुस्थानातील सत्ताधीशांचा एक संघ उभारूनत्यांच्याद्वारे मराठी सरदारांना नर्मदापार हाकलण्याचीयोजना बनवली. त्याच्या या योजनेत राजपूत राजांचामहत्त्वपूर्ण सहभाग असून जाट राजा सुरजमल तसेच माजी वजीर सफदरजंगही त्यात सामील होते. या राजकारणापैकी आपणांस कुंभेरीचा वेढा व खंडेराव होळकराच्या मृत्यूपर्यंतचाच भाग बघायचा आहे. 

    स. १७५३ च्या सप्टेंबर अखेर रघुनाथरावाच्यानेतृत्वाखाली मराठी फौजा नर्मदापार झाल्या.रघुनाथरावाची हि पहिली हिंदुस्थान स्वारी असूनकागदोपत्री हिचे प्रयोजन दिल्लीत सुरु असलेल्यासफदर - बादशाह झगड्यात बादशाहची बाजू घेण्याचेअसले तरी पेशव्याने आपल्या भावास या संघर्षातूनअलिप्त राहण्याचा कानमंत्र दिल्याचे पुढीलघटनाक्रमावरून दिसून येते.
    रघुनाथास खरोखर बादशाही पक्षाचा बचावकरायचा असता तर तो लगोलग दिल्लीच्या वाटेलालागला असता किंवा दिल्लीत ठाण मांडून बसलेल्याव बादशाह विरुद्ध लढणाऱ्या सुरजमल जाटाच्याराज्यावर चालून गेला असता. परंतु यातील काहीएकन करता तो मार्गाने खंडण्या वसूल करत  परस्पर राजपुतान्यात निघून गेला.

    राजपुतान्यात खंडण्या गोळा करून आणिदिल्लीतील लढा मिटल्याचे पाहून दादासाहेबराजपुतान्यातून पुढे येऊ लागला. यावेळी त्याचानेमका रोख कुठे होता याची कागदोपत्री स्पष्टता होतनसली तरी माझ्या मते, यावेळी तो पेशव्याच्या आज्ञेनेकर्जफेडीसाठी द्रव्य गोळा करणे किंवा बंगाल - बिहारप्रांती स्वारी करण्याच्या इराद्याने पुढे येत होता.

    रघुनाथरावाचे उद्दिष्ट काहीही असले तरी त्यालाउद्दिष्टपूर्तीकरता आपल्या सरदारांवर, विशेष करूनशिंद्यांवर अधिक विसंबून राहणे भाग होते. याचे मुख्यकारण म्हणजे, छ. शाहूच्या मृत्यूनंतर दौलतीच्याकर्जाचा बोजा पेशव्याच्या बोकांडी बसल्याने त्यानेआपल्या सैन्यात बरीच घट केली होती. त्याउलटशिंद्याने आपल्या सैन्याची सुमारे तीस हजारांवर भरतीनेली असून होळकराकडे दहा पंधरा हजाराच्यावरसेना नव्हती. तात्पर्य, पेशवेबंधूंना शिंद्यांविषयी इतकेममत्व का, या प्रश्नाच्या अनेक उत्तरांपैकी एक म्हणजेलष्करी बाबतीतील पेशव्यांचे दौर्बल्य होय. तसेचव्यक्तिशः पाहिले तर रघुनाथरावाची जयाजी, दत्ताजीशिंदे बंधूंवर जितकी खुशमर्जी होती तितकीमल्हारराव होळकरावर नव्हती. ज्याला याविषयीआक्षेप असेल त्याने शिंदेशाही इतिहासाची साधने,खंड ३ चे वाचन करावे. असो.

    दक्षिणेतील निजाम बंधूंना दाबात ठेवण्यासाठीदिल्लीतील इमादउल्मुल्कला राजी राखणे आवश्यकअसल्याने रघुनाथास त्यालाही एकदम टाळता येतनव्हते. त्याचप्रमाणे संभाव्य बंगाल - बिहारस्वारीकरता बादशाही मदतीचीही आवश्यकता होती.अन्यथा केवळ स्वबळावर आखलेली मोहीम अंगाशीयेण्याचीही शक्यता होती. त्यामुळे इमादची मर्जीराखणे ओघाने आले आणि त्याच इमादने जेव्हासमोरून जाट राजावर स्वारीचा प्रस्ताव मांडत त्यामोहिमेत प्राप्त द्रव्यातील निश्चित एक हिस्सा देऊकरताच रघुनाथास हि मसलत स्वीकारण्याखेरीजकोणताच पर्याय उरला नाही.

    रघुनाथरावाच्या आदेशानव्ये मल्हारराव होळकरानेआपला पुत्र खंडेराव यास चार हजार स्वारांसहनोव्हेंबर महिन्यात दिल्लीस पाठवले. तिथे त्याने दि.२१ नोव्हें. रोजी किशनदासच्या तळ्याजवळ आपलामुक्काम ठोकला.
    
    खंडेराव होळकर दिल्लीस आला त्यावेळी बादशहाआणि मीरबक्षी इमाद यांच्यात राजकीय संघर्ष सुरुहोता. त्यामुळे खंडेराव होळकरास आपाल्या पक्षातखेचण्याची बादशाही सल्लागारांची धडपड सुरुझाली. परंतु मुख्य छावणीतून निघतेसमयीचमल्हाररावाने त्यास इमादच्या पक्षास चिटकूनराहण्याची आज्ञा केल्याने खंडेराव बादशाही पक्षासअजिबात बधला नाही.
    याप्रसंगी वजीर इंतिजामच्या सल्ल्यावरूनबादशाहने त्यास देऊ केलेल्या २२००० सोन्याचीनाणी, पोशाख व अन्य देणग्यांचा खंडेरावने स्वीकारकेला नाही. तसेच बादशाही भेटीचा प्रसंग आला तेव्हात्याने औपचारिक रितीरिवाजही नीटसे पाळले नाहीत.शिवाय बादशहाने त्यास मानाच्या पोशाखासोबततलवार देऊ केली असता, ती बादशाहने स्वहस्तेआपणास द्यावी असा हट्ट धरला होता.
    खंडेरावचे याप्रसंगीचे वर्तन निश्चितचबाणेदारपणाचे होते. त्याने रिवाजाप्रमाणे चार ऐवजीदोनदा सलाम करणे, भेटीच्या वेळी नजर करण्यासजवळ पैसे किंवा देणगी दाखल वस्तू नसण्याचे सांगणेइ. गोष्टी त्याचा स्वातंत्र्यप्रिय बाणेदारपणाच व्यक्तकरणाऱ्या होत. कारण, रूढार्थाने तो किंवा त्याचापिता बादशाही नोकर नव्हते. त्यामुळे शाही रिवाजत्यांच्याकडून जसेच्या तसे पाळले जाण्याची अपेक्षा करणे मुळी चुकीचे आहे, आणि ते देखील तुर्की सत्ताअखेरच्या घटका मोजत असताना.  परंतु जदुनाथसरकार सारखे इतिहासकार यास दारूच्या नशेत वर्तनम्हणतात आणि आमचे देशी इतिहासकारही त्यांचीचरी ओढतात, या कर्मास काय म्हणावे !     
   
    खंडेराव होळकर दिल्लीस दाखल झाल्यावरतेथील राजकारणास वेग आला. इमादने लष्कराच्यापगाराकरता बादशाहकडे पैशांची मागणी केलीअसता, बादशहाने त्यास मीरबक्षी पदाकरिता दिलेल्याजहागिरीतून सैन्याच्या काही तुकड्यांचे पगारभागवण्याची आज्ञा केली. तसेच जहागिरीतून वसूलगोळा करताना प्रजेला त्रास न देण्याची सूचनाहीकेली.
    पैकी, प्रजेच्या छळाची बाब बाजूला ठेवली तरीजहागिरीतून वसूल गोळा करण्याची आज्ञा इमादलाजाटांच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यास पुरेशी होती. कारणत्याला जहागिरीदाखल मिळालेल्या फरिदाबादजिल्ह्यातील बव्हंशी भाग जाटांनी व्यापलेला होता.इथे लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब म्हणजे भरतपुरचाबदनसिंग, फरिदाबादेत स्थिरावलेला बल्लू / बाळू तसेच गोहदकर वगैरे जाट सत्ता वेगवेगळ्या, स्वतंत्रअसल्या तरी वेळप्रसंगी त्या एकत्र येण्याचा धोकाहोताच. शिवाय जाटांनी अलीकडे केलेली दिल्लीआणि आसपासच्या प्रदेशाची लूटमार लक्षात घेतात्यांच्याकडून मिळणाऱ्या संपत्तीचा लोभ त्या सर्वांवरस्वारी करण्यास इमादला उद्युक्त करत होताच.

    बादशहाची परवानगी मिळताच इमादने आपलाहस्तक अकिबत महंमदखान यास फरिदाबाद जिल्हाताब्यात घेण्यास पाठवले. त्याने बल्लू / बाळू जाटासठार करून फरिदाबाद ताब्यात घेत आपली चढाईतशीच पुढे चालू ठेवली. दरम्यान डिसेंबर महिन्यातअकिबत दिल्लीस आला त्यावेळी इमाद आणिरघुनाथरावातील जाट मोहिमेचा मनसुबा पक्का झालाअसून मल्हाररावाच्या आज्ञेने खंडेराव होळकरअकिबत सोबत जाटांच्या प्रदेशावर चालून गेला.

    खंडेरावाने आपला तळ पलवलच्या दक्षिणेस १७मैलांवर होडाळ येथे ठेवून आसमंतातील बरसान,नंदगाव हि सुरजमलच्या ताब्यातील ठाणी जिंकूनघेतली. दरम्यान स्वतः इमाद देखील या मोहिमेतसहभागी झाला असून त्याने घासेरा किल्ल्यावरीलस्वारीत खंडोजीला मदतीसाठी बोलावले. याजोडगोळीने हा किल्ला अल्पवधीत जिंकून घेतला.

    दरम्यान रघुनाथराव आणि सुरजमल या दुसऱ्याआघाडीवर वेगळेच नाट्य सुरु झाले होते. रघुनाथरावनर्मदेच्या पुढे - मागे असतानाच सुरजमलने जयपूरच्यामाधोसिंगासोबत संरक्षणाचा गुप्त करार केला होता.परंतु मराठी फौज राजपुतान्यात आल्यावर सुरजमलनेआपला वकील रूपराम कोठारे यास दादासाहेबाकडेरवाना करत तहाची वाटाघाट आरंभली. त्यानुसारजाट मराठी सेनापतीस चार लाख रुपये तसेचबादशाहकडून जाटांच्या बंदोबस्ताकरता जितकीरक्कम बादशाही संरक्षण करारानुसार मिळणार होती,तितकी देण्याचे मान्य केले. परंतु सुरजमलसोबतसमझोता न करता त्याच्याकडून कोट्यवधी द्रव्यउकळण्याची दादा आणि इमादची मसलत यापूर्वीचशिजल्याने जाटाच्या अटी अमान्य करण्यात आल्या वतह करायचाच असेल तर जाटाने आपणांस दोन कोटरुपये द्यावे अशी नवी मागणी पुढे करण्यात आली.अर्थात, जाटाकडून यास नकार मिळणे स्वाभाविकहोते. पर्यायाने जाट आणि मराठी सरदारांचे युद्धअटळ होते.       

    स. १७५४ च्या डिसेंबर - जानेवारीत रघुनाथरावाचीसुरजमल जाटाविरुद्धची मोहीम सुरु झाली. मैदानीसंघर्षात निभाव न लागल्याने सुरजमलने कुंभेरीचाआसरा घेतला तेव्हा रघुनाथरावाने त्या किल्ल्यास वेढाघातला. किल्ल्याची संपूर्ण नाकेबंदी करणेदादासाहेबास शक्य नव्हते. तसेच किल्ल्याची तटबंदीफोडण्यासारखा तोफखानाही लष्करासोबत नव्हता.अशात मल्हाररावाने आपल्या मुलास कुंभेरीच्यामोर्च्यावर येण्यास सांगत इमादकडे बादशाहीतोफखान्यातील तोफांची मागणी करत त्यास कुंभेरीच्या वेढ्यात बोलावले. त्यानुसार इमाद व त्याचा लष्करी अधिकारी अकिबत कुंभेरीस येऊन दाखल झाले. ( मार्च १७५४ )

    मल्हाररावाचा मदतीस येण्याचा निरोप मिळालात्यावेळी खंडेराव मेवात कडील प्रदेशातील जाटांचीउठवण्याच्या कामात गर्क होता. बापाचा आदेशमिळताच मेवातमधून तो कुंभेरीस रवाना झाला. तिथेयेऊन त्याने किल्ल्याच्या मोर्चेबंदीचे काम हाती घेतले.त्याच्या नेतृत्वाखाली किल्ल्याच्या तटापर्यंत जाणारेभुयारासारखे वरून आच्छादलेले खंदक खोदण्यातआले. असेच एके दिवशी खंदकांची पाहणी करतअसता किल्ल्यावरून झालेल्या तोफा - बंदुकांच्यामारगिरीत खंडेराव मानेस गोळी लागून ठार झाला. (स. १७५४ मधील फाल्गुन वद्य एकादशी रोजी )
    त्यावेळी तीन विवाहित स्त्रिया, दोन कलावंतिणी,पाच रक्षा मिळून दहा स्त्रिया खंडेराव सोबत सतीगेल्या. त्यासमयी अहिल्याबाई देखील सती जाणारहोती परंतु मल्हाररावाने तिला सती जाण्यापासूनरोखत पुत्रवत लेखले.

    खंडेराव होळकराच्या मृत्यूबद्दल सुरजमल जाटानेखेद व्यक्त होळकरांकडे दुखवट्याची वस्त्रे पाठवूनदिली. इमादनेही मल्हाररावाची भेट घेत त्याचे सांत्वनकरताना ' मी तुमचा पुत्र आहे ' अशा आशयाचे उद्गारकाढले.

    खंडेरावच्या मृत्यू नंतर काही दिवसांनी जाटांनीछापा घालून मुख्य मराठी सैन्यापासून आठ कोसांवरजाऊन राहिलेल्या धारकर पवारांच्या कारभाऱ्यास --रंगराव शिवदेव ओढेकर यास ठार करून त्याचे लष्करलुटले. ( चैत्र शुद्ध चतुर्दर्शी नंतर )
    
    सारांश, प्रभावी तोफखान्याअभावी जाटांनापराभूत करणे मराठी सरदारांना शक्य होईना आणिकेवळ याच कारणाकरता वजीर इंतिजामच्यासल्ल्याने बादशहा अहमदशहा, इमादने वारंवारमागणी करूनही शाही तोफा कुंभेरीस रवाना करेना.उलट इंतिजामच्या सल्ल्यानुसार बादशहा मार्च -एप्रिल दरम्यान केव्हातरी शिकारीनिमित्त दिल्लीतूनबाहेर पडला व  मे च्या सुमारास सिकंदराबादेसजाऊन पोहोचला. या स्वारीत त्याने शाही तोफखानासोबत बाळगला असून वरकरणी जरी शिकारीचेनिमित्त सांगितले जात असले तरी वजिराच्या गुप्तकटानुसार बादशाही संरक्षणासाठी सफदरजंग आणिसुरजमल यांच्याशी हातमिळवणी करून इमाद आणित्याचे मराठी मित्र यांच्या नाशासाठी आघाडीउभारण्याचा मुख्य हेतू होता.
    दरम्यान खंडेराव होळकराच्या मृत्यूची बातमीमिळाल्यावर बादशाहने बापूराव हिंगणे या तुर्कीदरबारातील पेशव्याच्या वकिलामार्फत आपला शोकव्यक्त करत  दुखवट्याची वस्त्रे व अलंकार मल्हाररावहोळकर व त्याच्या  पत्नीस पाठवून दिले.

    इकडे कुंभेरीचा वेढा रेंगाळत चालला होता. अखेरउभयपक्षी बोलाचाली होऊन मे च्या मध्यावर पुढीलअटींवर तह घडून आला :- (१) तीन वर्षांच्याहप्त्याने मराठ्यांना तीस लाख रुपये देणे. (२ )जाट राजाने पेशकस म्हणून दोन कोट रुपयेबादशाहस द्यावे अशी इमादने पुरी सुरजमलकडेमागणी केली होती. ते दोन कोट रुपये देण्याचेसुरजमलचा वकील रूपराम याने कबूल केले.परंतु यात आता बदल घडून हे दोन कोट रुपयेबादशाह ऐवजी मराठे आणि इमाद यांना देण्यातयावे असे ठरले.
    तहाच्या अटी ठरल्यावर दि. १८ मे रोजी इमाद तर२२ मे रोजी रघुनाथाने कुंभेरीतून आपला तळ हलवतमथुरेस मुक्काम ठोकला.

    अस्सल संदर्भ साधनांच्या आधारे कुंभेरीचा वेढाआणि खंडेरावाच्या मृत्यूची हकीकत उपरोक्तपणेजुळवता येते. याउलट प्रकार भाऊ बखरीत वर्णिलाआहे. मुळात या बखरकारास दिल्लीतील सफदर -बादशाह झगड्याची कल्पना नाही. इमादउल्मुल्कच्यासांगण्यानुसार रघुनाथराव जाटावर चालून गेल्याचेत्याला ठाऊक नाही. कुंभेरीच्या वेढ्यात तोफांचाअभाव असल्याचे स्पष्ट असतानाही बखरकार  मात्रकिल्ल्याच्या डोक्यावरून पलीकडे गोळे फेकणाऱ्यामराठी सैन्यातील तोफांची माहिती देत बसतो.तहामध्ये पेशव्याला तीस लाख रुपये मिळाल्याचाउल्लेख असला तरी हा साठ लाखांचा आकडा देतो.आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, खंडेरावहोळकराच्या मृत्यूचे वर्णन करताना, तो एके दिवशीराजश्री मल्हारराव होळकर यांचा पुत्र, खंडेरावहोळकर, केवळ बेहोष होता ; त्याचीआयुष्यमर्यादा सरली. म्हणोन त्यास मुंगीस पक्षफुटतात तैसा प्रकार जाहला. भोजन करूनमोर्चियांत निशाणापाशी आला. तो एकाएकीचप्रळय-वीज पडते तैसे होऊन, जेजालेची गोळीअकस्मात लागून मोर्च्यांत ठार जाहाला. शुभ्रवर्णचक्षु होऊन गतप्राण जाहाला... .. "  असे वर्णनदेतो.

    त्याउलट शिंद्यांच्याच छावणीतून दि. १८ एप्रिल१७५४ रोजी लिहिलेल्या पत्रात खंडेरावच्या मृत्यूबद्दलपुढील माहिती मिळते :- फालगुण वद्य ११येकादशीस राजश्री खंडेराव होलकर यास गोलीमानेस लागोन मृत्यू पावले. .. " पत्रलेखक चिंतोकृष्ण वळे हा शिंद्यांचा आश्रित असून जयाजी,जनकोजी, दत्ताजी व महादजीचा लेखक म्हणून त्यानेकाम पाहिले आहे.

    विश्वास कोणाच्या वृत्तांतावर ठेवायचा ? भाऊबखरीचा लेखक शिंद्यांचा पक्षपाती आहे यासमजुतीवर कि प्रत्यक्ष शिंद्यांच्या लेखकाने लिहिलेल्यापत्रातील मजकुरावर ! ज्यामध्ये खंडेराव बेहोष वगैरेअसल्याचा अजिबात उल्लेख नाही.

     विशेष म्हणजे शिंदेशाही इतिहासाची साधने खंड३ मधील उपरोक्त पत्र सर्वच इतिहासकारांच्यानजरेखालून जाऊनही त्यांनी बखरीतील केवळ एक 'बेहोष ' शब्द प्रमाण मानून खंडेराव मद्याच्या धुंदीतअसल्याच्या थापा ठोकल्या आहेत. इतिहासाची, एकाऐतिहासिक चरित्राची अशी हानी करण्याच्यापापापासून रियासतकार सरदेसाई पासून  फॉल ऑफमुघल एम्पायरचे जदुनाथ सरकारही मुक्त नाहीत.

संदर्भ ग्रंथ :-
१) शिंदेशाही इतिहासाची साधने ( खंड ३ ) :-संपादक - आनंदराव भाऊ फाळके    
२) भाऊ साहेबांची बखर :- संपादक - र. वि.हेरवाडकर
३) मुघल साम्राज्याचा ऱ्हास ( भाग १ ) :- ( मूळलेखक - जदुनाथ सरकार ) मराठी अनुवाद :- ग. श्री.देशपांडे
४) मराठी रियासत ( खंड ४ ) :- गो. स. सरदेसाई  

Comments

Popular posts from this blog

बाळाजी आवजी चिटणीस